Monday 19 August 2013

हे करून पाहा................

१) रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत
चाला आणि हो अगदी सुहास्यवदनाने.

2) जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती,
उत्साह आणि दिलदारी.

3) रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.

4) जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या.
त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.

5) खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून ! आप
चंगा… तो जग चंगा.

6) एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन
लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.

7) आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल
वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात
वाया घालवू नका.

8.) ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत,
ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल
दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे
सुधारता येईल, ते पहा.

9) स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका.
इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते
तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.

10) भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा.
आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील
चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे
सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार
पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान
बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द
प्रेझेंट!

11) प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार ?
इतरांनाही थोडी संधी द्या ना !

12) दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे
वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका.
तो आतून काय'भोगतोय', काय'सोसतोय'ते तुम्हास कोठे
ठाऊक आहे?

13) दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत ? संपतील राजा !
परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर
हिरवा येतोच की !

14) तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून
यायचा आहे ! हे धरा मनी. पहा… कसे
आशादायी नि प्रसन्न वाटेल.

15) तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.
त्यांना प्राधान्य द्या.

No comments:

Post a Comment